आयपीएल क्रमवारीत गुजरात अव्वल   

कोलकाता : आयपीएल २०२५ च्या हंगामात आतापर्यंत ४० सामने खेळण्यात आले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत सध्या गुजरातचा संघ अव्वल आहे. गुजरात संघाचे १२ गुण आहेत. त्यांनी आगामी सामना जिंकला की गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र होणार आहे. प्लेऑफमध्ये गुजरातचे स्थान जवळपास निश्‍चित झाले आहे.  
 
अव्वल चार मध्ये तीन संघ आहेत ज्यांनी अद्याप आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. गुजरात टायटन्सने आयपीएलचा ३९ वा सामना ३९ धावांनी जिंकून प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. गुजरातचा संघ सध्या गुणतालिकेत १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. गुजरातचे आता ६ सामने शिल्लक आहेत, त्यापैकी किमान ३ सामने जिंकायचे आहेत. गुजरातने दोन सामने जिंकले तरी प्लेऑफचे तिकीट पक्क करेल. मात्र कोणत्याही संघाच्या निकालांवर अवलंबून न राहायचे असल्यास गुजरातला ३ सामना जिंकावे लागतील. 
 
दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स अनुक्रमे दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या स्थानावर आहेत. तिन्ही संघ त्यांच्या पहिल्या आयपीएल जेतेपदासाठी मैदानात आहेत. दिल्लीने ७ पैकी ५ सामने जिंकले आहेत, आरसीबी आणि पंजाबने ८-८ सामने खेळले आहेत आणि दोघांनीही ५-५ सामने जिंकले आहेत.जर या संघांनी आणखी ४ सामने जिंकले तर त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित मानला जाऊ शकतो.लखनौ ८ सामन्यांत ५ विजयांसह पाचव्या स्थानावर आहे. 
 
लखनौला 4 सामने जिंकावे लागतील पण त्यांना त्यांचा नेट रन रेटही थोडा सुधारावा लागेल. दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सलग पराभवानंतर चांगले पुनरागमन केले आहे. सध्या मुंबईने ८ पैकी ४ सामने जिंकले आहेत, पुढील ६ सामन्यांपैकी किमान ५ सामने जिंकावे लागतील. चेन्नई सुपर किंग्सने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत आणि ते स्पर्धेबाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. चेन्नईला उर्वरित सर्व ६ सामने जिंकावे लागतील, त्यानंतर त्यांचे १६ गुण होतील आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी असेल. सध् चेन्नईचा संघ १० व्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचीही हीच परिस्थिती आहे, त्यांनी ८ पैकी फक्त २ सामने जिंकले आहेत. सनरायझर्स हैदराबादने ७ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे. केकेआरने ८ पैकी ३ सामने जिंकले आहेत आणि ते गुणतालिकेत ७ व्या स्थानावर आहेत, त्यांना पुढील सर्व ६ सामने जिंकावे लागतील. सध्या ऑरेंज कॅप साई सुदर्शनकडे आहे. 
 
गुजरात टायटन्सच्या या फलंदाजाने ८ सामन्यांमध्ये ५२.१२ च्या सरासरीने ४१७ धावा केल्या आहेत. लखनौचा निकोलस पूरन ३६८ धावांसह दुसर्‍या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सच्या गोलंदज प्रसिद्ध कृष्णाकडे पर्पल कॅप आहे. त्याने ८ सामन्यांमध्ये १६ विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसर्‍या स्थानावर असलेला कुलदीप यादव १२ बळीसह दुसर्‍या स्थानावर आहे. 

Related Articles